भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर शेअर केला आहे. “मेरा नाम है मल्लिकार्जुन खर्गे .. मैं ईश्वर का अवतार हूं…” असे खरगे म्हणत आहेत.
यावरही शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी यावरही भ्रष्टलेख लिहावा, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.
संजय राऊत सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करीत असून तथ्यहीन गोष्टी पसरवत आहेत. त्यावर एक्स समाजमाध्यमावर पोस्ट शेअर करीत बावनकुळे म्हणाले आहे की, संजय राऊत…तुमचे नेते मल्लिकार्जुन खरगे बघा काय म्हणतात?
आदरणीय मोदीजींवर टीका करण्याआधी मल्लिकार्जुनबुवांचा हा व्हिडीओ बघा! आणि ठरवा. मल्लिकार्जुनबुवा खरगे स्वतःला देवाचे अवतार म्हणू लागले.
‘मेरा नाम है मल्लिकार्जुन खरगे.. मैं ईश्वर का अवतार हूं…’ यांच्यावरही भ्रष्टलेख लिहा”, असे आव्हान बावनकुळे यांनी राऊत यांना दिले आहे.