सुधीर मुनगंटीवार : ‘निवडणूक लढवण्यासाठी तयारच नव्हतो…’

Photo of author

By Sandhya

सुधीर मुनगंटीवार

मी आधीपासूनच ठरवले होते, विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर खचायचे नाही, जनतेच्या सेवेसाठी निवडणुकीत उभा असून जनतेला वाटले की,

त्यांचे प्रश्न काँग्रेसचा उमेदवार चांगल्याने सोडवू शकतो, तर ते काँग्रेसला निवडून देतील, असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक्झिट पोलनंतर व्यक्त केले आहे.

दरम्यान मुनगंटीवार पुढे बोलताना म्हणाले की, जनतेने मला संधी दिली तर मी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी जिवापाड काम करेन. मात्र, जनतेने संधी दिली नाही तर जनतेला मलाच निवडून द्या, अशी बळजबरी मी करू शकत नाही.

चंद्रपुरातून निवडणूक लढवण्यासाठी मी तयारच नव्हतो. पक्षाचा आदेश आला म्हणून तयार झालो, असे त्यांनी म्हटले आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील दोन विधानसभा क्षेत्रही येतात. या दोन विधानसभा क्षेत्रात माझा फारसा जनसंपर्क नव्हता. तरीही मी लोकसभेची निवडणूक लढविली.

आंबेडकर, वाजपेयी, गांधींचाही पराभव झाला अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही पराभव झाला होता. पराभवानंतर तिघांनी आपले उद्दिष्ट बदलले नाही, नैतिकता सोडली नाही.

पराभव झाला तर मी पूर्ण शक्तीने माझ्या क्षेत्रात कामासाठी लागेन, मी चंद्रपूरबद्दल साशंक नाही. मात्र, निर्णय जनतेला घ्यायचा आहे हे विसरून चालणार नाही, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page