आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित

Photo of author

By Sandhya

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय ‘आप’चे दुसरे खासदार संजय सिंह यांच्याही अडचणी कमी झालेल्या नाहीत. त्यांच्या निलंबनाची मुदतही वाढवण्यात आली आहे.

विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत आपच्या दोन्ही नेत्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.  राघव चढ्ढा का अडकले ? पाच खासदारांचा असा दावा आहे की, दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे त्यांच्या संमतीशिवाय पाठवण्याच्या प्रस्तावावर त्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता.

हा प्रस्ताव आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी मांडला. भाजपचे तीन खासदार, बीजेडी आणि एआयएडीएमकेचे एक खासदार आहेत ज्यांनी निषेध नोंदवला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.

Leave a Comment