आदित्य ठाकरे यांच्यावर मध्यरात्री गुन्हा दाखल; अपुर्ण पुलाचे उद्घाटन करणे भोवले

Photo of author

By Sandhya

आदित्य ठाकरे

परळमधील डेलिसल ब्रिज परवानगीशिवाय उघडल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध एनएम जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुलाचे काम अद्याप अपुर्ण असल्याची तक्रार बीएमसी अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे. १६ नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे आणि इतरांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते.

आयपीसीच्या कलम १४३, १४९,३२६ आणि ४४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे मुंबई पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment