येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गणेशोत्सवाशी निगडीत काही बाबी शेअर केल्या. यामध्ये गणेशोत्सवात पुणे मेट्रो रात्री 12 पर्यंत सुरू ठेवणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
याशिवाय सर्व विसर्जन मिरवणुका वेळेत निघतील यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. याबाबत आयुक्त श्रावण हार्डीकर यांना सूचना केल्याचंही त्यांनी नमूद केलं.
यासाठी गणेश मंडळांसोबत समन्वय ठेवला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्याला का वाईट वाटत? या दरम्यान एकाने अजित पवार यांना ” तुम्ही कालच्या भाषणात शरद पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं बोलला होतात, ” याबाबत विचारलं.
यावर बोलताना पवार म्हणतात, ‘मी हे बोललो, पण तुम्हाला का वाईट वाटलं?”