अजित पवार : सोम्या गोम्यांच्या बोलण्यावर मी बोलत नाही…

Photo of author

By Sandhya

अजित पवार

असल्या सोम्यागोम्याने बोललेल्यावर मी बोलत नाही, अशी भूमिका मांडत संजय राऊत यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अगदी मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिले.

पुण्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेत ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. संजय राऊतांच्या टीकेनंतर पहिल्यांदाच अजितदादांनी प्रत्युत्तर दिले.

206 व्या शौर्यदिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आणि क्रीडा युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी अभिवादन केले. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर अजित पवार यांनी भाष्य केले.  

काय म्हणाले होेत संजय राऊत मी एक वक्तव्य ऐकलं, काहीही झाले तरी मी तुम्हाला पाडणारच; पण आमच्या पाडापाडीच्या खेळात पडला, तर पहिले तुम्ही पडाल नाव घेऊन बोलायचं असतं, आमच्यात दम आहे. हवा बहुत तेज चल रही है, अजितराव टोपी उड जायेगी, असे विधान संजय राऊत यांनी केले होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page