आमदार संजयजी जगताप यांनी आंबेगाव बुद्रुक व आंबेगाव खुर्द येथील कचरा वाहतुकीचा प्रश्न सोडविला

Photo of author

By Sandhya

आमदार संजयजी जगताप यांच्या पुरंदर हवेली मतदारसंघात आंबेगाव बुद्रुक व आंबेगाव खुर्द हा परिसर असून या भागात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न आमदार संजयजी जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे व कचरा वाहतुकीसाठी आमदार फंडातून घंटागाड्या उपलब्ध करून दिल्यामुळे कचरा वाहतुकीचा प्रश्न सुटला आहे यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या मतदारसंघातील कचरा व्यवस्थापनासाठी व कचऱ्याची विल्हेवाट होण्यासाठी नागरिकांनी पुरंदर हवेली चे कार्यक्षम आमदार संजय जगताप यांच्याकडे मागणी केली होती आमदार संजय जगताप यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला व आमदार फंडातून घंटागाड्या प्रभाग क्रमांक ४२, सर्वे नंबर १५,१६, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव पठार सदाशिव दांगट नगर सिंहगड कॉलेज परिसर, दभाडी या परिसरासाठी उपलब्ध करून देऊन कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावला आहे आत्ता या नागरिकांना कचरा जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही यावेळी या परिसरातील अनेक कार्यकतौ व नागरिक उपस्थित होते

Leave a Comment