अशोक चव्हाण : काँग्रेसमधील अनेकजण भाजपमध्ये येण्यास तयार…

Photo of author

By Sandhya

अशोक चव्हाण

काँग्रेसमध्ये असलेल्या लोकांना त्यांचे भविष्य नाही. त्यामुळे काँग्रेसमधील बरेच लोक भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक लोक भाजपमध्ये प्रवेश करतील, असे भाजप नेते अशोक चव्हाण यांनी आज (दि.१३) माध्यमांशी बोलताना सांगितले. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

CAA च्या मुद्यावरून केरळ आणि कर्नाटकातील सरकारे अडथळे निर्माण करतील हे स्वाभाविक आहे, असेदेखील अशोक चव्हाण यांनी आज बोलताना स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्माकर वळवी यांनी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर अशोक चव्हाण माध्यमांशी बोलत होते.

Leave a Comment