मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाव टाकून करोडो मराठ्यांची मागणी ओबिसीमधून आरक्षण देण्याची मागणी असताना दहा टक्के आरक्षण जाहीर केले.
हे पण आरक्षण टिकणारे नाही. मराठ्यांना ओबिसी प्रवर्गातूनच आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी ता. १३ रोजी दिला.
गरजवंत मराठ्यांच्या लढ्यासाठी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांची येथील वृंदावन मंगल कार्यालयात बुधवारी ता. १३ रोजी संवाद सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, मराठा समाजाची लढाई अंतिम टप्यामध्ये आली होती. आतापर्यंत ५७ लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या सव्वा करोड मराठ्यांना प्रमाणपत्रास प्राप्त होणार आहे.
राहीलेल्या समाजाचे काय म्हणून सरकारने ओबिसीतून आरक्षण देण्याचे ठरवले अधिसूचना काढली आपली मागणी नविन नाही, ओबीसीमधून आरक्षण ही जूनीच मागणी आहे.
असे सांगून सन २०१८ ला १३ टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले होते. तर २०२४ ला दहा टक्के आरक्षण दिले. वर्षिक लोकसंख्या घटते का? वाढते असा प्रतिप्रश्न करून मागासवर्गीय आयोगाने २८ टक्के मराठे मागास असल्याचा अहवाल दिला आहे.
मग १४ टक्के आरक्षण द्यायला पाहीजे होते दहा टक्के आरक्षण कशासाठी दिले असा सवाल त्यांनी केला. चारही बाजूनी मराठ्यांच्या छातीत खंजीर खुपसण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सर्व समाजाने एकजुट दाखवा बघू २०२४ ला त्यांचा गुलाल उधळतात ते असे अव्हाण त्यांनी यावेळी दिले.
मराठा समाजातील लोकप्रतिनीधीना जातीपेक्षा पक्ष महत्वाचा वाटत आहे. म्हणून समाजाने डोळ्यासमोर आपल्या मुलांचे भविष्य ठेवावे राजकारण ठेवू नका असा सल्ला देत समाजाची झालेली एकजुट फुटू देवू नका लवकरच सहा ते सात कोटी समाजाची मोठी सभा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
देशात अनेक आंदोलने झाली मात्र पहीला निर्णय असेल जे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एस.आय.टी. स्थापन करून चौकशी लावली आहे.
मात्र ती एसआटी अजून माझ्याकडे फिरकलीचनाही असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी निलंगा येथे ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदीराचे दर्शन घेऊन शहरात रॕली काढण्यात आली होती ऐन उन्हाळ्यात तरूण वर्ग या रॕलीमध्ये सहभागी झाले होते. या संवाद सभेला मोठ्या प्रमाणात तरूण व महिलांची उपस्थिती होती.
उपोषण काय असते ते माझ्या शेजारी येऊन बसा… यावेळी मनोज जरांगे-पाटील म्हणालेकी, १७ दिवस अमरण उपोषण केले त्यामुळे स्वभाव छिडछिडा झाला कांही अपशब्द तोंडातुन गेले असाले तरी याबाबत मी माफी मागितली आहे.
परंतु अमरण उपोषण काय असते हे पहायचे असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या शेजारी बसून उपोषण करावे योगा प्राणायाम करायची गरज नाही त्यांची पोटपाट एक होईल सलाईन लावायला हाताची शिर सुध्दा सापडणार नाही असा खिल्ली उडवत माझ्या नादाला लागू नका तुम्ही चुकीच्या माणसाच्या नादाला लागलात ओबिसीमधून आरक्षण घेतल्या शिवाय तुम्हाला सुट्टी नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.