बच्चू कडू : “आम्ही सध्या कोणाच्याही बाजूने नाही” , चर्चांना उधाण…

Photo of author

By Sandhya

बच्चू कडू

येत्या काही महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकासाठी  प्रत्येक पक्षाने जय्यत तयारी सुरु केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागावाटपावर चर्चा सुरु असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच  प्रहार जनशक्‍ती पक्षाने  अमरावती मतदारसंघावर दावा केला आहे.

याविषयी बोलताना प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अमरावती मतदारसंघावर आमचाच दावा असल्याचे म्हटले आहे. आम्ही सध्या कुणाच्याही बाजूने नाही, असेही त्यांनी सांगितलेय.

त्याशिवाय अमरावतीची जागा  प्रहारला मिळाली पाहिजे, नाहीतर नवनीत राणायांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी, असे पर्याय त्यांनी सरकारसमोर ठेवले आहेत.

बच्चू कडू यांनी,”आम्ही सध्या कोणाच्याही (महायुती, महाविकास आघाडी) बाजूने नाही. काही मुद्दे आणि पक्षाच्या धोरणाप्रमाणे आम्ही आपली राजकीय भूमिका निश्चित करणार आहोत. मी कुणाच्या बाजूने हे कोडं आहे आणि ते व्यवस्थितपणे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

प्रहारची राजकीय मजबुती जिथे होईल तिकडे आम्ही जाऊ, असे बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.  हो मी राजकीय मोलभाव ( बार्गेनिंग ) करतो आहे आणि ते आम्ही व्यवस्थित करू.

लोकसभाऐवजी आम्हाला विधानसभेत जास्त जागा हव्या आहेत, असेही बच्चू कडू म्हणाले.दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच गोंधळ निर्माण झाला आहे.

बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांनाही ऑफर दिली आहे. ते म्हणाले की, अमरावतीमध्ये प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत. इतर पक्षाचे तेवढे नाहीत. म्हणून अमरावती लोकसभेची जागा प्रहारला मिळाली पाहिजे.

एकतर अमरावतीची जागा प्रहारला मिळावी. नाहीतर नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी. त्यांच्याशी अजून कुठलीही चर्चा झालेली नाही. असे त्यांनी म्हटले आहे.

महायुतीच्या आजच्या एकत्रित प्रेस कॉनस्पेन्स संदर्भात मला माहिती नाही. आजच्या महायुतीच्या प्रेस कॉन्फरन्स बद्दल मला निरोप नाही, निमंत्रणही नाही म्हणून मी तिथे उपस्थित नाही, असे बच्चू कडू म्हणाले.

कदाचित महायुतीतील पक्षांना मला विश्वासात घ्यावं असं वाटलं नसावं. मला का बोलावलं नाही हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना माहीत असेल. ते त्यांना विचारलं पाहिजे. मला बोलावलं नाही गोष्टीत मी लक्ष घालत नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

Leave a Comment