बच्चू कडू : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदावरून हटविल्यास भाजपला फटका…

Photo of author

By Sandhya

बच्चू कडू

आमदार अपात्रतेच्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार मुख्यमंत्री विराजमान होतील, असा तर्क लावला जात आहे.

मात्र असे झाल्यास त्याचा फटका भाजपला बसू शकतो, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांना आता लवकर निर्णय द्यावा लागणार आहे.

अशावेळी जर एकनाथ शिंदे हेच अपात्र ठरले तर त्यांना मुख्यमंत्रिपद सोडणे भाग पाडणार आहे. अशावेळी मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार येऊ शकतात.

मात्र शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांनी या प्लॅन बीचा भाजपला फटका असेल, असा इशारा दिला आहे.

Leave a Comment