बच्चू कडू : “हे सरकारच आम्ही बनवलंय भाजपावाल्यांनी लक्षात ठेवावं”

Photo of author

By Sandhya

बच्चू कडू

प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी , बच्चू कडू आणि  भाजपात गेल्या काही दिवसांपासून खटके उडताना दिसतायेत. बच्चू कडू यांनी त्यांची भाजपावरील नाराजी अनेकदा उघडपणे बोलून दाखवलीय.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रहारला सामावून न घेतल्याने बच्चू कडू यांनी थेट इशारा दिलाय. मतदान मतपत्रिकेवर घ्या बच्चू कडू यांनी माध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, लोकसभेसाठी आम्ही महायुतीमध्ये आहोत की नाही?. हा संभ्रमित करणारा प्रश्न आहे. आम्ही लोकसभेची तयारी सुरू केलीय.

आम्हाला कुणी विचारलं तर एकत्र येऊ, नाही विचारलं तर विरोधात लढू. आम्ही (प्रहार जनशक्ती पार्टीने) ‘मी खासदार’ अभियान राबविण्याची तयारी करत आहोत. एका मतदारसंघात २०० ते ३०० उमेदवार उभे करण्याची आमची तयारी आहे, लोकसभेसाठी सर्वाधिक उमेदवारांची यादी आम्ही जाहीर करू. असे त्यांनी यावेळी म्हटलं.

जवळपास दोन ते तीन हजार उमेदवार जाहीर करण्याची तयारी आम्ही सुरू केलीय. लोकांचे मतदान कुठे जाते? हे समजून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. माझं मत कुठं जातं?, हे पाहण्यासाठी आम्ही शेकडो उमेदवार प्रत्येक मतदारसंघात उभे करू.

जेणेकरून सरकार, निवडणूक आयोगाला निवडणूक मतपत्रिकेवर घ्यावी लागेल. असं झालं तर आम्ही आमच्या अभियानात जिंकलो असं समजू. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रहार सर्वात पुढे राहील.”

“हे सरकारच आम्ही बनवलंय ” दरम्यान, भाजपाबद्दल बच्चू कडू म्हणाले, आमच्यावर याआधी वेगवेगळ्या प्रकारची टीका झाली आहे. परंतु, आमच्या मतदारसंघात काम करण्यावर लक्ष केंद्रीत केलं. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे दिव्यांग मंत्रालय तयार झालं. सगळं बरं चाललंय, याचा मात्र  त्यांनी (भाजपा) आमचा सरकारमधील वाटा विसरावा.

हे सरकार बनवताना आमचा सिंहाचा वाटा होता. आम्ही सरकारमध्ये सामील झालो नाही. मुळात हे सरकारच आम्ही बनवलंय. भाजपा मात्र नंतर या सरकारमध्ये सामील झाली आहे. हे भाजपावाल्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.

Leave a Comment