मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील हे मुंबईच्या दिशेने आंदोलन करण्यासाठी निघाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमरावती येथून प्रहारचे संस्थापक अध्यक्ष व आमदार बच्चू कडू हे देखील आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आज (दि.२०) रवाना झाले.
यावेळी ते म्हणाले की, मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलनाला यश यावे, समाजाचे भले व्हावे. या आंदोलनात मी आंदोलक म्हणून जातो आहे.
सरकार म्हणून माझी भूमिका संपली आहे. कुणबी नोंदीबाबत दुरुस्त्या सरकारने केल्या आहेत. सगेसोयरे बाबत सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे.
जरांगे – पाटलांनी देखील सरकारची भूमिका मान्य केली आहे. जरांगे यांनी सुचविलेल्या सर्व दुरुस्त्या सरकार म्हणून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
५४ लाख नोंदी सापडलेल्यांना जातीचे दाखले दिले पाहिजे, याबाबत सरकार सकारात्मक आहे. एका अर्थाने जरांगे- पाटील यांनी धोरणात्मक लढाई जिंकली आहे, असे कडू म्हणाले.