भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच तिसर्‍या टर्मसाठी अनुकूलता

Photo of author

By Sandhya

भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच तिसर्‍या टर्मसाठी अनुकूलता

भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच तिसर्‍या टर्मसाठी अनुकूलता दर्शविण्यात आल्याचे अमेरिकेतील प्यू या संस्थेच्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

या संस्थेने 20 ते 22 मे रोजी जगभरातील 24 देशांतील 30 हजार 861 लोकांच्या प्रतिक्रिया आजमावल्या. यामध्ये भारतातील 2,611 लोकांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि जागतिक मंचावर भारताला असणारे महत्त्व, याबाबत या सर्वेक्षणातून माहिती संकलित करण्यात आली आहे.

भारतातील 80 टक्के जनमत मोदी यांच्यासाठी अनुकूल असल्याचा दावा या संस्थेने केला आहे. जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्यू संस्थेने हा अहवाल प्रसारित केला आहे.

जगातील अन्य देशांतील 46 टक्के भारतीयांनी मोदी यांचा करिष्मा आगामी सार्वत्रिक निवणुकीत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे,तर विदेशातील 34 टक्के भारतीयांनी मोदी यांच्या नेतृत्वाबाबत प्रतिकूल मत व्यक्त केले आहे.

16 टक्के लोकांनी तटस्थता दर्शविली आहे. इस्रायलमधील 71 टक्के नागरिकांनी मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताबद्दल विश्वसनीयता व्यक्त केली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page