गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव सुरू होणार आहेत. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणरायला निरोप देण्यात आला. त्यानंतर काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाची सर्वत्र मोठी तयारी केली जात आहे.
नवरात्रोत्सव काळात साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भक्त येथे दाखल होतात. नऊ दिवस येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
त्याअनुषंगाने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सप्तशृंगी देवीच मंदिर भाविकांना नवरात्रोत्सव काळात २४ तास खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
१५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे. याशिवाय या काळात नांदुरी ते सप्तशृंगी गडादरम्यान खासगी वाहतूक देखील बंद करण्यात येणार आहे.
तसेच येथील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भाविकांना मंदिरात येण्या-जाण्यासाठी दोन मार्ग करण्यात येणार आहे. याद्वारे आता मंदिर प्रशासनाने तयारी करण्यास सुरुवात केली आहे.