
रिंगरोडसाठी मावळ, मुळशी, भोर आणि हवेली तालुक्यातील 15 गावांच्या भूसंपादनासाठी दुसर्या टप्प्यातील 636 कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला मिळाला आहे. या निधीचे दहा दिवसांत संबंधित तालुक्याच्या उपविभागीय अधिकार्यांना वितरण केले जाणार आहे.
निधी मिळाल्याने रिंगरोडच्या भूसंपादनाला गती येणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा रस्ते विकास महामंडळाने रिंगरोड तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
त्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून पूर्व आणि पश्चिम भागातील गावांमधून भूसंपादन केले जात आहे. पश्चिम भागातील काही गावांमधून संपादनासाठी संमती मिळाली असून, पूर्व आणि पश्चिम रिंगरोडसाठी 721 हेक्टर क्षेत्र जमीन संपादित करायची आहे.
त्यासाठी आतापर्यंत 1035 कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी 1021 कोटींच्या निधीचे भूसंपादनासाठी वाटप केले आहे. त्या निधीतून आतापर्यंत 205 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले की, 636 कोटींचा निधी मिळाला असून, त्यामध्ये मावळसाठी दोनशे कोटी, हवेलीसाठी चारशे कोटी तसेच भोरसाठी 36 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
पूर्व भागातील रिंगरोडसाठी खेड तालुक्यातील 13 गावांपैकी 11 गावांच्या जमिनींचा मोबादला निश्चित केला आहे. त्याला अंतिम मान्यता देण्यात आली असून, त्या ठिकाणचे 292 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. त्याकरिता शेतकर्यांना नोटिसा पाठविल्या आहेत.