PUNE : दुचाकी सर्व्हिस सेंटरला भीषण आग ; 25 दुचाकी जळून खाक

Photo of author

By Sandhya

25 दुचाकी जळून खाक

पुण्यातील आगीचं सत्र थांबायचं नाव घेता घेईना. सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिरामागे असलेल्या  एका दुचाकी विक्री दालनात गुरुवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्धा तासात आग आटोक्यात आणली. सर्व्हिस सेंटरमधल्या जवळपास 20 ते 25 दुचाकी जळाल्याची प्राथमिक माहिती आहे.

नवशा मारुती मंदिराजवळ टीव्हीएस शोरुम दुचाकी विक्री दालन आहे. गुरुवारी (५ ऑक्टोबर) सकाळी पावणेआठच्या सुमारास दुचाकी विक्री दालनात आग लागली. काही क्षणात आग भडकली.

दुचाकी विक्री दालनातील २० ते २५ दुचाकींना झळ पोहोचली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर, प्रभाकर उमराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन आग अर्धा तासात आग आटोक्यात आणली. आगीत २० ते २५ दुचाकी जळाल्या. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही.

Leave a Comment