BIG NEW : राजेंद्र गुढांचा शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षात एन्ट्री

Photo of author

By Sandhya

राजेंद्र गुढांचा शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षात एन्ट्री

राजस्थान विधानसभेत लाल डायरी दाखवत आपल्याच सरकारविरुद्ध आवाज उठवणारे राजेंद्र गुढा यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. दरम्यान, त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश केला आहे.यासाठी मुख्य़मंत्री खास राजस्थानमध्ये गेले आहेत.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी राजस्थान आणि महाराष्ट्राची संस्कृती एकत्र आले असल्याचे म्हटले. राजस्थानच्या राजकारणात सध्या एका लाल डायरीची बरीच चर्चा आहे, या लाल डायरीत राजस्थान सरकारच्या कथित भ्रष्टाचाराचा संपूर्ण काळा चिठ्ठा आहे.

या डायरीमुळे मुख्यमंत्री गेहलोत यांची डोकेदुखी चांगलीच वाढली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील यावरून गेहलोत यांच्यावर टीका केली होती. ही लाल डायरी गुढा यांच्याच हातात आहे.

काही दिवसांपूर्वी एका लाल डायरीत राजस्थानमधील गेहलोत सरकारच्या भ्रष्टाचाराचा आलेख असल्याचा उल्लेख अमित शाहांनी केला होता. तेव्हापासूनच राजस्थानच्या राजकारणात खळबळ माजली होती. हीच लाल डायरी गुढांकडे असल्याचे बोलले जात आहे. 

हेच राजेंद्रसिंह गुढा यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासाठी स्वतः राजस्थानला आले आहेत. आज आमदार गुढा यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार असून त्याच कार्यक्रमात काँग्रेसची साथ सोडून राजेंद्रसिंह गुढा शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page