
उन्हाळी सुट्ट्यांसाठी सासवड आगारातून लांब पल्ल्यांच्या मार्गावर बस सेवा उपलब्ध
उन्हाळी सुट्टी गावी जाणाऱ्या नागरिकांच्या, प्रवाशांच्या सोयीसाठी सासवड आगारातून नाशिक, सोलापूर, अहमदपूर (लातूर), दादर, अक्कलकोट, आंबेजोगाई, धुळे, बोरीवली, नांदेड व गोंदवले आदी ठिकाणी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या बस सेवांसाठी महिला, जेष्ठ नागरिक, दिव्यांग यांना नियमानुसार प्रवास भाड्यामध्ये सवलत मिळणार आहे. विविध मार्गांवर सुटणाऱ्या गाड्या व त्यांच्या वेळा पुढील प्रमाणे
नाशिक साठी शिवाजीनगर मार्गे सकाळी ०५.३०, ०६.००, ०८.३०, ०९.३०, १०.३०, दुपारी ०१.००
सोलापूर स्वारगेट इंदापूर मार्गे सकाळी ०६.१५, ०७.१५, ०८.१५, ०९.१५
अहमदपूर स्वारगेट इंदापूर बार्शी लातूर मार्गे ०६.००
दादर ०६.३०, ०७.४५
अक्कलकोट मोरगाव बारामती इंदापूर मार्गे ०६.३०
आंबेजोगाई स्वारगेट इंदापूर बार्शी मार्गे ०७.००
धुळे शिवाजीनगर नाशिक मार्गे ०७.३०
जेजुरी बोरिवली ०९.३०, ११.००
नांदेड स्वारगेट इंदापूर लातूर मार्गे ०५.३०
स्वारगेट सासवड गोंदवले ०८.३०
याप्रमाणे बस सासवड
बसस्थानकातुन प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत याशिवाय स्वारगेट सासवड फलटण पंढरपूर या मार्गावर सासवड आगाराच्या वतीने जादा बस सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी आगार प्रमुख मोहिनी ढेरे यांनी दिली. विविध लांब पल्ल्यांच्या मार्गावर थेट बससेवा उपलब्ध होणार असल्याने सासवड व तालुक्यातील प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन पुरंदर बस प्रवासी संघाचे अध्यक्ष तानाजी सातव यांनी केले आहे.
पंढरपूर बारामती फलटण सांगोला मंगळवेढा तसेच मोरगाव नीरा मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या सर्व
साध्या, जलद, निमआराम बसेस साठी सासवड पी एम पी बस स्थानकासमोरील थांबा अधिकृत बसथांबा म्हणून मान्यता देण्यात आली असून सासवड पर्यंतचे बसभगडे पीएमपी बस स्थानकापर्यंत ग्राह्य असणार आहे. प्रवाशांनी तिकीट मागताना सासवड पी एम टी स्टॅन्ड पर्यंत तिकीट मागावे. स्वारगेट सासवड मार्गावर असणारे अधिकृत प्रवास भाडे सासवड पीएमपी बस स्थानकापर्यंत मान्य असेल अशी ही माहिती तानाजी सातव यांनी यावेळी दिली.