
चाकण :
मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर संशय घेत तिला हाताने बेदम मारहाण करून तिचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिच्या मित्रावर गुरुवारी (दि.१९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन २०२३ ते १९ डिसेंबर या कालावधीत मुटकेवाडी येथे हा प्रकार घडला.
आत्महत्याग्रस्त महिलेच्या बहिणीने याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून चाकण पोलिसांनी प्रकाश सातपुते (वय ३१, रा. मुटकेवाडी, चाकण.) याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश सातपुते व संबंधित महिला हे एकमेकांच्या ओळखीचे होते. फिर्यादीची बहीण हीस प्रकाश हा लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर संशय घेत होता. तसेच हाताने मारहाण करून तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होता. त्यामुळे तिने प्रकाश याच्या छळास कंटाळून आत्महत्या केली. मृत महिलेच्या जवळ मिळालेल्या सुसाईड नोट वरून हा प्रकार उघडकीस आला.
चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राम तलवाडे हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.