छगन भुजबळ : भुजबळांना अश्लील मेसेज पाठविणारा तरुण जेरबंद

Photo of author

By Sandhya

छगन भुजबळ

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मोबाईलवर अश्लिल भाषेत मेसेज पाठविणाऱ्या व्यक्तीविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी औरंगाबादमधून इंद्रनील कुलकर्णी या तरुणाला याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी अंबड पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती.

अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या मोबाईलवर टेक्स मेसेज व व्हॉट्सअपच्या माध्यमातून अश्लिल भाषेत मेसेज करत त्यांना धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक किरण शेवाळे तपास करीत आहेत.

Leave a Comment