महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाला जेजुरी गडावर प्रारंभ.

Photo of author

By Sandhya

जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवा निमित्त करवीर पिठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते जेजुरी गडावर श्री खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींची घट स्थापना करण्यात आली.
कुलदैवत खंडोबा देवाच्या वर्षाकाठी आठ यात्रा भरतात.दरवर्षी 50 लाखाहून अधिक भाविक येथे देवदर्शनासाठी येतात.
खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाला धार्मिक महत्व आहे.पौराणिक काळात मनी आणि मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी महादेवाने खंडोबाचा अवतार घेवून दैत्याशी युद्ध केले. सहा दिवस युद्ध करून दैत्यांचा पराभव करून विजय मिळविला. या विजयाचे प्रतीक म्हणून पौराणिक काळापासून जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जातो.
आज खंडोबा मंदिरात देवाची पूजा अभिषेक झाल्या नंतर उत्सव मूर्तींची वाजत गाजत मिरवणूक काढून मूर्ती रंग महालात आणण्यात आल्या. करवीर पिठाचे पिठाचे र्शंकराचार्य श्री नृसिंह भारती ,देवसंस्थान चे विश्वस्त,पुजारी सेवक वर्ग व ग्रामस्थांच्या वतीने पूजा करून घट स्थापना करण्यात आली.
या उत्सवा निमित्त गडावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
घट स्थापना निमित्त हजारो भाविकांनी खंडोबा देवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

Leave a Comment