
आमदारांसह सर्वपक्षीय नेत्यांची कार्यक्रमास हजेरी
दि. ३ मांजरी येथील जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय नन्नावरे यांच्या नेतृत्वाखाली जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी जि. प. सदस्य दिलीप घुले, पुणे म. न.पा. सह आयुक्त नितीन उदास, पुरवठा अधिकारी चिंतामणी जाधवर, शासन नियुक्त नगरसेवक, अजित घुले, बाळासाहेब घुले, विकी माने, माजी ग्रामपंचायत सदस्य निलेश घुले, बालाजी अंकुश, प्रा. निलेश घुले, काँग्रेस पक्षाचे दिलीप शंकर तुपे, बाळासाहेब विभुते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बाबा मोरे, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुवर्णा गोरे, उद्योजक सुनील गुप्ता, अनिल घुले, लायन क्लबचे राजेश अग्रवाल, पोलिस पाटील अमोल भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.