‘The Burning Bus’ drama on Nira-Baramati Road; shuttle bus gutted by fire.

Photo of author

By Sandhya

निरा-बारामती रस्त्यावर ‘द बर्निंग बस’चा थरार; शटल बस जळून खाक

आज पहाटेच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. पणदरे खिंडीमध्ये निरा-बारामती दरम्यान धावणाऱ्या एका सीएनजी (CNG) बसला अचानक भीषण आग लागली.ही घटना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बस पणदरे खिंडीतून निरेकड़े जात असताना अचानक बसमधून धूर निघू लागला.चालकाच्या आणि प्रवाशांच्या ही गोष्ट वेळेत लक्षात आल्यामुळे बस तातडीने थांबवण्यात आली.बसमधील सर्व प्रवाशांना तातडीने आणि सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले.
सुदैवाने जीवितहानी टळली:
या भीषण आगीमध्ये एसटी बसचे प्रचंड नुकसान झाले असून बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे.मात्र,सुदैवाने चालक,वाहक आणि सर्व प्रवाशांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

Leave a Comment

You cannot copy content of this page