
ताबा सुटला आणि कार थेट नाल्यात कोसळली
खारघर सेक्टर ६ येथील मध्यरात्रीची घटना
पनवेल : चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट २० फूट नाल्यात कोसळली. हा अपघात सोमवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडला. यात कारचालक किरकोळ जखमी झाला आहे.
खारघर सेक्टर ६ येथून सुरेंद्र शहा कारमधून (एमएच ४६, बीबी १२८६) घरी जात होते. यावेळी कारवरील त्यांचा ताबा सुटला आणी कार नाल्यात कोसळली.
ही घटना मध्यरात्री घडल्याने शहा यांनी मंगळवारी सकाळी क्रेनच्या सहाय्याने आपली कार नाल्यातून बाहेर काढली. खारघर पोलिस ठाण्यात या घटनेबद्दल माहिती दिल्याने खारघर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.