स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्याचे जेजुरीतून अक्कलकोट कडे प्रस्थान

Photo of author

By Sandhya

जेजुरी पुणे

श्री स्वामीमय सेवा ट्रस्टतर्फे जेजुरी ते अक्कलकोट पायी पालखी सोहळ्याचे जेजुरीतून अक्कलकोट कडे प्रस्थान झाले असून या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने स्वामी भक्त सहभागी झाले आहेत.
श्री स्वामींची पालखी स्वामी मंदिरात नेहण्यात आली. या ठिकाणी पूजा आरती व महाप्रसाद झाल्या नंतर पालखी रथात ठेवण्यात आली.जेजुरी शहरातून या सोहळ्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फुलाची उधळण व फटक्यांची आतशबाजी करण्यात आली.
जेजुरी रेल्वे स्टेशन जवळील साई मंदिरात हा सोहळा मुक्कामी विसावला.बाबुरडी पाटी, बारामती ,जंक्शन, इंदापूर टेभुर्णी, श्रीक्षेत्र आरण, हिवरे, लांबोटी, सोलापूर, वळसंग, १४ तारखेस अक्कलकोट येथे विसावणार आहे. दत्तजयंती दिवशी अक्कलकोट येथील समाधी स्थळावर गुरुवर्य अण्णु महाराज यांचे उपस्थितीत अभिषेक महापुजा आदि धार्मिक विधी होणार आहे .


जेजुरी यथे श्री स्वामी समर्थांचे मंदिर उभारणीसाठी २२ वर्षा पुर्वी श्री स्वामीमय सेवा ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती तेव्हा पासून या ट्रस्टच्या वतीने जेजुरी ते अक्कलकोट पालखी सोहळा अखंडपणे सुरु आहे. ट्रस्टच्या प्रयत्नामुळे परिसरातील अनेक तरुण व्यसनमुक्त झाले आहेत जेजुरी येथे ऐतिहासीक होळकर तलावकाठी भव्य मंदिर पुर्णत्वास गेले आहे. तसेच भव्य अन्नछत्राची उभारणी झाली आहे.अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष भगवान डीखळे,सचिव माऊली खोमणे यांनी दिली.

Leave a Comment