चंद्रकांत पाटील : मी छाती ठोकपणे सांगतो की, महादेव जानकर कुठेच जाणार नाही…

Photo of author

By Sandhya

चंद्रकांत पाटील

रासपचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर हे दुखी असून महायुतीच्या बैठकांना पदाधिकाऱ्यांनी हजर राहू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

त्यामुळे ते अन्य पक्षाबरोबर जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, महादेव जानकर हे महायुतीबरोबर असून मी छाती ठोकपणे सांगतो की, ते कुठेच जाणार नाही.

देवेंद्र फडणवीस हे त्यांचे परममित्र आहेत. तर पंकजा ताई या त्यांच्या बहीण आहेत. त्यामुळे हे दोघेही महादेव जानकर यांच्या मनातील जे काही प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी समर्थ आहेत.

माझे एकदा समाधान होऊ द्या आणि मग मला बैठकीला बोलवा. अशी भूमिका त्यांनी (महादेव जानकर) मांडली आहे. त्यांचे हे म्हणणे ठीक आहे. ते कुठेही गेले नाही आणि जाणारदेखील नाही, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी; चित्रफीत शेअर करणाऱ्याला अटक उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ‘सोशल मीडिया’वर आक्षेपार्ह मजकूर टाकणे सहायक फौजदाराला भोवले… “विरोधकांनी शहाणपण शिकवण्याची गरज नाही,” चित्रा वाघ यांनी सुनावले; म्हणाल्या, “त्यांना केवळ देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा…”

आगामी लोकसभा निवडणुकीला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. दरम्यान भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून महायुतीकडून राज्यभरात बैठका देखील सुरू झाल्या आहेत.

त्या बैठकांना कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी जाऊ नये, असे आवाहन रासपचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले. त्या सर्व घडामोडींदरम्यान आज पुण्यात भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे.

या बैठकीला खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित आहेत. बैठकीपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधून अनेक राजकीय घडामोडींबाबत भाष्य केले.

Leave a Comment