राज्यात ६४२ अभ्यासक्रमांसाठी मुलींना शंभर टक्के शुल्कमाफ असणार आहे. शिक्षण संस्थांना सरकारकडून सप्टेंबरमध्ये प्रवेशाची रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे संस्थाचालकांनीही थोडे थांबावे.
शुल्क भरल्याशिवाय मुलींना प्रवेश नाकारणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन यांच्यातर्फे उभारण्यात आलेल्या पहिल्या रोबोटिक्स आणि ऑटोमेशन या विषयातील उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले.
त्या वेळी ते बोलत होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, विभागीय सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, सचिव डॉ. महेंद्र चितलांगे, प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी बहुउद्देशीय संगणक प्रयोगशाळेचेही उद्घाटन करण्यात आले.
पाटील म्हणाले, पाॅलिटेक्निकसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना शिक्षण शुल्कमाफीचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत असेल. परंतु सध्या काही पालकांकडून शुल्क भरल्याशिवाय मुलींना प्रवेश नाकारत असल्याचे तक्रारी येत होत्या.
अशा पालकांनी माझ्याशी संपर्क करा, मी तातडीने शिक्षणसंस्थांना सूचना दिल्या जातील. कोणतेही शुल्क न घेता मुलींना प्रवेश द्यायचे आहेत. त्याचे शुल्क सप्टेंबरपर्यंत शिक्षण संस्थांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. त्यामुळे शिक्षण संस्थांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल. त्यानंतर शुल्क न भरल्याने प्रवेश नाकारत असतील, तर संस्थांचे मान्यता रद्द करण्यात येणार आहे.
विद्यार्थिनिंची संख्या वाढली उच्च शिक्षणाची खाते हाती घेतल्यानंतर राज्यातील विद्यार्थिसंख्या ३३ लाख होती. “स्कूल कनेक्ट’सारखे उपक्रम राबवून, रात्रंदिवस काम करून मुले-मुले मिळून विद्यार्थिसंख्या ४३ लाख झाली. दहा लाख विद्यार्थी वाढले. ही संख्या ५० लाखांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. मुलींच्या शुल्कमाफीमुळे ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.