माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशाच असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. आपल्याच कर्मचार्याला दिलेली ही मॅनेज मुलाखत असल्याचे सांगून बावनकुळे यांनी ठाकरे यांना पाच प्रश्न केले आहेत.
दहशतवादी कसाबचे समर्थन करणार्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय? 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता? हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला काहीच वाटले नाही का?
सत्तेवर आल्यास हिंदूंची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे. त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का? राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात, त्याबद्दल तुम्ही गप्प का?
यासोबतच उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता? ठाकरे यांनी या प्रश्नांचीही उत्तरे द्यावीत, असे आव्हान बावनकुळे यांनी केले आहे.