चंद्रशेखर बावनकुळे : विरोधकांच्या डायरीत विकास नाहीच!

Photo of author

By Sandhya

चंद्रशेखर बावनकुळे

विकास हा विरोधकांच्या डायरीत नाही. विकासाची डायरी पंतप्रधान मोदीकडे आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीने देशातील काही नामांकित पत्रकारांवर बहिष्कार टाकणे हे त्यांच्या हुकुमशाही व राजेशाहीवृत्तीचे प्रतिक आहे.

आणि याचा कितीही निषेध केला तरी तो कमीच आहे. जनताच या प्रवृत्तीला नक्की उत्तर देईल. आणीबाणीच्या काळातही असेच झाले होते. पत्रकारितेवर बंधने लावणे हे लोकशाहीला न मानण्यासारखे आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्‍हणाले.

मराठवाड्याचा बॅकलॉग निघणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात झाली हा आनंदाचा दिवस असून यामुळे मराठवाड्याचा बॅकलॉक कमी होण्याची सुरुवात झाली आहे.

उद्धव ठाकरे सरकारने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राची वैधानिक महामंडळे बंद करून अन्याय केला. जेव्हा- जेव्हा भाजपेतर सरकारे आली त्या प्रत्येकवेळी विकास थांबला. लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून तेढ निर्माण केली गेली.

मतासाठी राजकारणात तुष्टीकरण झाले. ओबीसींचे आरक्षण कमी होणार नाही दरम्यान, आज दुपारी बावनकुळे यांनी संविधान चौकात सुरू असलेल्या सर्व शाखीय कुणबी ओबीसी कृती समितीच्या धरणे आंदोलनाला भेट दिली.

आंदोलकांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली. सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार असले तरी ओबीसींचे आरक्षण शून्य टक्केही कमी होणार नाही, याविषयी सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी आंदोलकांना दिली. ओबीसी समाजाच्या मागे केंद्र व राज्य सरकारसह संपूर्ण भाजपा उभी असल्याची ग्वाही दिली.

Leave a Comment