मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : विधानसभेला विजयाचा रेकॉर्ड करायचा आहे…

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपण लोकसभेला त्यांना त्यांची जागा दाखवली. धनुष्यबाण आणि आपल्या शिवसेनेने २ लाख ६० हजार मते जादा घेतली. आपला स्ट्राईक रेट वाढला आहे. म्हणून या विधानसभेलाही आपल्याला विजयाचा रेकॉर्ड करायचा आहे, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. वैजापूर येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लाडक्या बहिणींना २१०० रूपये देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीसह वर्षाला १५ हजार देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोणी उपाशी झोपणार नाही. वृद्धांना पेन्शन योजनेंतर्गत २१०० रूपये दिले जातील.

तरूणांसाठी २५ लाख रोजगार निर्माण केले जातील. अंगणवाडी आणि आशासेविकांना महिन्याला १५ हजार देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांना वीजबिलात ३० टक्के सवलत दिली जाईल, असे अश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. महाविकास आघाडीने आमचा जाहीरनामा चोरला

अडीच वर्षापूर्वी विकास विरोधी सरकार होतं. आपलं सरकार आल्यानंतर कल्याणकारी योजना सुरू केल्या. आमच्या वचननाम्याची चोरी करून तुमचा जाहीरनामा करता, पण चोऱ्या करून वचननामा बनवता येत नाही. त्यांना आता कळलं आहे की, हे सरकार कायम राहणार आहे. लाडक्या बहिणींचा त्यांनी धसका घेतला असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

Leave a Comment