’चिन्ह भेटलं म्हणजे माणसं निवडून येतात, असं नाही’…. : बच्चू कडू

Photo of author

By Sandhya

बच्च कडू

गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षांसमोर सुरु असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय अखेर काल जाहीर केला. अध्य्क्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांचा गटचं अधिकृत शिवसेना असल्यावर शिक्कामोर्तब केलं.

यामुळे शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार नाहीत हे स्पष्ट झालं. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

यावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलतांना बच्चू कडू म्हणाले,’एकनाथ शिंदेंकडे ४० आमदार असल्यानं शिवसेना त्यांचीच असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हा निकाल खोटा असेल, तर ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात जाता येतं. पण, न्यायालयाच्या निकालावर आक्षेप घेतल्यास मग कठीण आहे.’

त्यांनी पुढे बोलतांना शिंदेंना सल्लाही दिला ते म्हणाले,’धनुष्यबाण चिन्हापेक्षा कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं लागते. चिन्ह भेटलं म्हणजे माणसं निवडून येतात, असं नाही’ असा सल्लाही कडूंनी शिंदे गटाला दिला आहे.

Leave a Comment