चोरट्यांनी टाकला घरावर डल्ला; पावणे दोन लाख रुपये लंपास

Photo of author

By Sandhya

कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना राजरत्ननगर येथे घडली. फिर्यादी वीरेंद्र रामप्रकाश द्विवेदी (रा. राजरत्ननगर, सिडको, नाशिक) हे दि. २ ते ८ एप्रिलदरम्यान बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलिस हवालदार देशमुख करीत आहेत. 

Leave a Comment