
नवी मुंबई :
जुईनगर येथील डी मार्ट समोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घाडली आहे .. सकाळीं साडे नऊ ते दहाच्या सुमारास घडली आहे.
दुचाकीवर आलेल्या दोन इसमानी राजाराम ठोके यां कंत्राटदारावर गोळीबार केलाय. तब्बल 5 राऊंड फायर करुन आरोपी फरार झाले असून ठोके जखमी असून त्याच्यावर वाशीतील एम.जी.एम.रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. घटनास्थळी नवी मुंबई पोलीस दाखल झाले असून फॉरेन्सिक टीम देखील तपास करतेय. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु असून सखोल तपास करण्यात येतोय. दरम्यान राजाराम ठोके हे ए पी एम सी मधील कचऱ्याचे कंत्राटदार आहेत , त्यांना गेल्या अनेक महिन्या पासून धमकीचे फोन येत होते