
करमळ्याच्या कोंढार चिंचोलीची केळी विदेशात शेतकऱ्यांना एकरी उत्पन्न मिळतंय चार ते पाच लाख
ऊस शेतीला पर्याय
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली या गावात ऊस शेतीला पर्याय म्हणून शेतकरी केळी पिकाकडे वळले असून कमी वेळेत व कमी खर्चात एक रक्कमी एकरी चार ते पाच लाख रुपये त्यांना उत्पन्न मिळू लागले असून या गावातील केळी देश विदेशात बोटीमार्फत जाऊ लागली आहे यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.