चाकण येथील उद्योजकाचे अपहरण करून, त्याच्याकडे एक कोटी रूपयांची मागणी करण्यात आली. आरोपींनी उद्योजकाजवळील 20 हजार रुपये काढून घेत, उर्वरित रक्कम न दिल्यास कुटुंबियांना संपविण्याची धमकी दिली.
ही घटना गुरूवार (दि. 21) रात्री साडे अकराच्या दरम्यान आळंदी फाटा, एकतानगर परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय धुलाप्पा कुरूंदवाडे (55 रा. एकतानगर, चाकण. मूळगाव : सांगली) हे उद्योजक आहेत. आरोपी आकाश विनायक भुरे (22, रा. नाणेकरवाडी ता. खेड), शुभम सरोदे, अजय येलोटे, सोहेल पठाण, पन्या गोसावी आणि आणखी एक अशा सहा जणांनी मिळून फिर्यादी जात असलेल्या दुचाकीसमोर रिक्षा आडवी लावली.
आरोपींनी कुरुंदवाडे यांच्याशी हुज्जत घालत, मतू आमच्या रिक्षाला धडक का मारली, नुकसान भरपाई देफ म्हणत फिर्यादीच्या गाडीची चावी काढून घेतली; तसेच त्यांना रिक्षात बसवून शिरोली येथील एका शेतात नेले.
तेथे रात्री 12 वाजेपर्यंत डांबून ठेवले. फिर्यादीला हत्याराचा धाक दाखवत, मतुझा मोठा व्यवसाय मोठा आहे, आम्हाला एक कोटी रूपये दे नाहीतर तुझ्यासह घरच्यांची देखील गेम करून उडवून टाकू.
दोन दिवसात 12 लाख पाठवून देफ अशी धमकी आरोपींनी दिली. फिर्यादीच्या बॅगेतील 20 हजार रूपये आरोपींनी काढून, रात्री दुचाकीवर सारा सिटी येथे सोडून दिले.
पुन्हा शनिवारी (दि. 23) रोजी आरोपींनी सात लाख रूपयांसाठी वेगवेगळ्या नंबरवरून कुरुंदवाडे यांना धमकीचे फोन केले. याविरोधात फिर्यादीने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी आकाश भुरे यास अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.