सकाळपासूनच सुरू असलेला पाऊस त्यातच दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये सुरू असलेली चुरस यात थरावर थर रचताना रात्रीपर्यंत मुंबईत सुमारे 107 गोविंदा जखमी झाले.
त्यातील 14 गोविंदाना रुग्णालयात दाखल केले आहे तर 31 गोविंदावर बाह्य रुग्ण कक्षात उपचार सुरू आहेत 62 गोविंदावर उपचार करून घरी सोडण्यात आले. रुग्णालयात गोविंदावर उपचाराची विशेष सोय केली असून सुमारे 125 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.
पालिकेची वैद्यकीय यंत्रणा सकाळपासूनच कामाला लागली आहे. रात्री नऊपर्यंत 107 गोविंदा जखमी झाले आहेत. जखमी गोविंदापैकी केईएम रुग्णालयात 31 जखमींवर उपचार केले असून 23 गोविंदावर उपचार सुरू आहेत.
तर 7 गोविंदाना रुग्णालयात दाखल केले असून एकाला घरी पाठविले. सायन रुग्णालयात 7 गोविंदांवर उपचार करण्यात आले.