जैन समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन राज्याची संस्कृती राजधानी पुण्यात होत आहे. याचा मोठा आनंद होत आहे. जैन समाजाचा कार्यक्रम हा केवळ समाजाचा नाही. तर भारताच्या जीडीपीचा कार्यक्रम आहे. देशाच्या जीडीपीच्या वाढीचा रस्ता जैन समाजातून जातो, असे प्रतिपादन भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.३०) केले.
पुणे येथील बिबवेवाडी येथे आयोजित बीजेएस राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जोपर्यंत आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवत नाही. तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपवू शकत नाही. महाराष्ट्रात नेहमीच 50 टक्के पाण्याची कमतरता आहे आणि जलसंधारण ही एकमेव गोष्ट आहे जी ती सोडवू शकते.
2020 मध्ये केंद्र सरकारने एक पाणी टेबल अहवाल तयार केला होता. ज्यामध्ये भारतातील सर्व राज्यांमध्ये पाण्याची पातळी खाली गेली आहे. पण महाराष्ट्र हे एकमेव राज्य होते, ज्यात पाण्याची पातळी वाढली होती, असे त्या अहवालात नमूद केले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायची असेल, तर पाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल, हे लक्षात आले आहे. महाराष्ट्रात 50 टक्के पेक्षा अधिक जमीनी ही कोरडवाहू आहे.
सरकारी शाळेत शिक्षण चांगले दिले जाते. तर दुसरीकडे सरकारी शाळेत शिक्षण खराब असते, असे बोलले जाते. पण महाराष्ट्र त्याला अपवाद ठरला आहे. कारण अनेक मुले आज सरकारी शाळेत शिकत आहेत, असे त्यांनी सांगितले. जैन गुरूंनी समाजाला शिकवण दिली आहे. जैन समाज जेवढं कमावतो, तेवढं दान देखील तो करतो.
संविधानाची मूल्य समजली तरच आपली मुलं चांगली नागरिक बनू शकतात. मला या कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाले होते. त्याच वेळेस मी सांगितले होते की, काहीही झाले, कितीही काम असले, तरी मी या कार्यक्रमाला येणार असल्याचे संयोजकांना सांगितले.