धाकादायक..! खडकवासला धरणात फेकली मुदत संपलेली औषधे; लाखो नागरिकांच्या जीवाशी खेळ

Photo of author

By Sandhya

खडकवासला धरणात फेकली मुदत संपलेली औषधे; लाखो नागरिकांच्या जीवाशी खेळ

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात औषधाचा साठा फेकण्यात आल्याची धाकादायक घटना बुधवारी समोर आली. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे अधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

इतका मोठा साठा खडकवासला धरणाच्या पाण्यात फेकण्यात आल्याने येथील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. धरणावर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास चोपाटीवर धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमामात औषधांचे बॉक्‍स फेकलेले दिसले.

यामध्ये औषधाच्या बाटल्या इंजेक्‍शन असे अनेक प्रकारचे साहित्य दिसून येत आहे. ही माहिती अधिकाऱ्यांना दिली. कर्मचाऱ्यांनी पाण्यात पडलेल्या औषधाच्या बाटल्या बाहेर काढल्या असून घटनास्थळी काचांचा कच दिसून येत आहे.

“खडकवासला धरणाच्या पाण्यात मुदत संपलेली औषधे फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशा प्रकारे हा धोकादायक कचरा पाण्यात फेकून प्रदूषण करणाऱ्या व्यक्ती नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहेत.

कारण, याच धरणाचे पाणी पुणे व परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी सोडले जाते. धरणाच्या पाण्यात असा कचरा टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

याबाबत पोलीस आयुक्तांनी दखल घेण्याची आवश्‍यकता आहे.” -सुप्रिया सुळे, खासदार “सदर औषध साठा हा कोणी वापरला आहे? त्यात कोणत्या नमुन्याचे औषध आहे, ते कोणी टाकले? याचा शोध सुरू आहे.” – सचिन वांगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हवेली

Leave a Comment