धक्कादायक..! पाणीपुरी खाणं पडलं महागात; 80 जणांना विषबाधा…

Photo of author

By Sandhya

पाणीपुरी खाणं पडलं महागात; 80 जणांना विषबाधा

जळगाव- जिल्ह्यातील चोपडामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. कमळगावच्या आठवडी बाजारात पाणीपुरी खाल्ल्यामुळे ८० जणांना विषबाधा झाली आहे. काही रुग्णांना चोपडा रुग्णालयात तर काहींना जिल्ह्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. कमळगाव येथील आठवडी बाजारासाठी चाचवणी, मितावली, पिंपरीसह आजूबाजूच्या भागातील गावकरी आले होते. अनेकांनी ही पाणीपुरी खाल्ली होती, तसेच अनेकांनी पाणीपुरी घरी पार्सल नेलं होतं.

पाणीपुरी खाल्ल्यानंतर अनेकांची तब्येत बिघडली. मंगळवारी सकाळी अनेकांना उलट्या, जुलाब, पोटदु:खी जाणवू लागली. त्यानंतर त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बाहेरचं खाताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page