पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करणा-या बार्शीतील प्रसाद देठे या तरूणाने मराठा आरक्षणासाठी लाईव्ह व्हिडिओ करून व चिठ्ठी लिहून गळफास घेत पुण्यात जीवन संपवले.
हा प्रकार आज (बुधवार) सकाळी उघडकीस आला असून, देठे यांच्या जाण्याने सामाजिक व सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त होत आहे.
तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे सेवेकरी म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. लिहिलेल्या चिठ्ठीत फक्त मराठा आरक्षण मिळावे यासाठीच आपण जीवन संपवत असल्याने माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख केलेला आहे.