धक्कादायक..! सरकारी अधिकाऱ्याचा मित्राच्या मुलीवरच अत्याचार

Photo of author

By Sandhya

सरकारी अधिकाऱ्याचा मित्राच्या मुलीवरच अत्याचार

मित्राच्या मुलीवर बलात्कार पोलिसांच्या माहितीनुसार दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही मुलगी अधिकाऱ्याच्या मित्राची मुलगी होती. याप्रकरणी  दिल्ली पोलिसांनी या वरिष्ठ अधिकार्‍याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत आणि बाल शोषणाच्या प्रकरणांना रोखण्यासाठी कठोर POCSO कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

या प्रकरणात अधिकाऱ्याच्या पत्नीवरही अत्याचारात मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दिल्ली पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्धच्या आरोपांची पुढील चौकशी करत आहेत ही मुलगी बारावीची विद्यार्थिनी असल्याचे समजते.

2020 मध्ये तिच्या वडीलांचे निधन झाले. त्यानंतर आरोपीने तिला आपल्या घरी आणले. 2020 ते 2021 या कालावधीत त्याने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे.

तरुणी गरोदर राहिल्यानंतर आरोपीने या पत्नीला सांगितल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्याच्या पत्नीने कथितपणे त्यांच्या मुलाला औषधे आणण्यास सांगितले आणि घरीच गर्भधारणा संपुष्टात आणली, असे अल्पवयीन मुलीने तिच्या तक्रारीत पोलिसांना सांगितले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Leave a Comment