परळीत एका हॉटेल मॅनेजरवर सिगारेटचे पैसे मागितल्याने चार तरुणांनी गोळीबार केल्याची घटना घडली. अज्ञात तरुणांचा पोलीस तपास करत आहेत.
परळी अंबाजोगाई रोडवर कनेरवाडी शिवारात असलेल्या एका हॉटेलवर बुधवारी (दि. ९) रात्री चार तरुणांनी सिगारेटचे पॉकेट खरेदी केले. हॉटेलच्या मॅनेजरने या सिगारेटचे पैसे मागितले असता त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.
तसेच ग्लास व साहित्य फेकून मारले. याच दरम्यान चौघांमधील एका तरुणाने मॅनेजरला जीवे मारण्याच्या उद्देशाने तीन गोळ्या झाडल्या. या खळबळजनक प्रकारानंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस या अज्ञात चार जणांचा शोध घेत आहेत.