धक्कादायक..! ताज हॉटेलवर पुन्हा बॉम्बहल्ल्याची धमकी

Photo of author

By Sandhya

ताज हॉटेलवर पुन्हा बॉम्बहल्ल्याची धमकी

मुंबईवर दहशतवादी हल्ला, बॉम्ब स्फोट आणि अतिरेकी घुसल्याच्या खोट्या कॉल्सचे सत्र सुरुच असून सोमवारी रात्री ताज हॉटेलवर बॉम्ब टाकायला चाललो आहे.

तुम्हाला जे करायचे आहे ते करा, अशी धमकी देणारा कॉल आला. या कॉलमुळे सर्वच यंत्रणांना अर्लट जारी करण्यात आला होता. तपासणीमध्ये हा कॉल खोटा असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. 

नवी दिल्लीतील मंगल बाजार रोड येथील रहिवासी असलेल्या धर्मपाल सिंग (३६) याने हे कॉल केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या मुख्यनियंत्रण कक्षामध्ये सोमवारी सायंकाळी साडेसात वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत एका अनोळखी नंबरवरुन २८ कॉल आले.

कॉल करणारा व्यक्ती असबंध बडबडत होता. याच कॉलरने मुंबई अग्निशमन दलाच्या नंबरवर कॉल करत ताज हॉटेलवर बॉम्ब टाकण्याची धमकी दिली. याची गांभीर्याने दखल घेत यंत्रणांना अर्लट जारी करण्यात आला.

पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने नवी दिल्लीतील मंगल बाजार रोड येथून आरोपीला अटक केली.

Leave a Comment