धनगर आरक्षण : जालन्यात जिल्हाधिकार्यालयाची तोडफोड, आंदोलनकर्ते आक्रमक…

Photo of author

By Sandhya

धनगर आरक्षण

गेल्या काही दिवसांपासून धनगर समाज आरक्षणाची मागणी सातत्याने लावून धरत आहे. यासाठी समाजाच्यावतीने राज्यातील अनेक भागात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन सुरू करण्यात आल्याचे पाहायला मिळते.

अशात जालन्यात सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आरक्षणाच्य मागणीसाठी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाच्यावतीने मोर्चा काढला होता.

सुरुवातीला हा मोर्चा शांततेत सुरु होता मात्र जिल्हाधिकारी कार्यालय येताच काही कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी कार्यालयाची तोडफोड सुरु केली.

आंदोलनकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा आंदोलनकर्त्यांनी यावेळी फोडल्या.त्यासोबतच याठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली.

यामुळे मोठा गोंधळ उडाला. जिल्हाधिकारी कार्यालयापाशी अडवणूक झाल्याने अनेक आंदोलनकर्ते गेटवर चढले, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना पांगवण्यास सुरुवात केली.

आरक्षणासाठी निघालेल्या मोर्च्यात कार्यकर्ते अचानक आक्रमक झाल्याने काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Comment