एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये बाचाबाचीनंतर राडा ; ५०-६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Photo of author

By Sandhya

गुन्हा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. दरम्यान, येथील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये बाचाबाचीनंतर राडा झाला.

पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या प्रकरणात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

या प्रकरणात ५० ते ६० अज्ञातांविरूद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आयपीसी आणि बॉम्बे पोलिस ॲक्टनुसार या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येणार आहे, असे देखील शिवाजी पार्क पोलिसांनी स्पष्ट केले आहे

Leave a Comment