एकनाथ शिंदे : “मविआच्या काळातही उद्धव ठाकरेंनी घेतली मोदींची गुप्त भेट…”

Photo of author

By Sandhya

एकनाथ शिंदें

देशात एकीकडे लोकसभा निवडणुका पार पडत आहेत. तर दुसरीकडे आता राज्यात एका मोठ्या दाव्याने खळबळ उडाली आहे. हा दावा केलाय खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना,

”महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे भाजपाबरोबर जाण्यास तयार होते आणि त्यासाठी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात बैठकही झाली होती, ही बाब खरी आहे” असे म्हटले. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

उद्धव ठाकरेंनीच बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी एकनाथ शिंदे म्हणाले,”पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर दिल्लीत बैठक झाली, हे सर्वांना माहिती आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात वैयक्तिक बैठक झाली होती. त्या बैठकीत भाजपाबरोबर जाण्याबाबत चर्चा झाली होती. या बैठकीचा तपशील मी आता सांगणार नाही. मात्र, ही बैठक झाली, हे खरं आहे.

याचाच अर्थ उद्धव ठाकरेंनी आधी भाजपा आणि महायुतीला फसवलं, महाराष्ट्रातील जनतेला फसवलं, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आणि दुसऱ्यांना महाविकास आघाडीलाही फसवण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न होता”, असे म्हटले.

त्यांना खुर्चीचा मोह सुटत नव्हता उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करताना,भाजपा आणि महाविकास आघाडी या दोघांनाही फसवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. कारण त्यांना खुर्चीचा मोह सुटत नव्हता. त्यांनी विरोधातील १२ आमदारांना निलंबित केले.

याशिवाय भाजपाच्या काही आमदारांना तुरुंगात टाकण्याचा आणि भाजपाचे २० ते २५ आमदार फोडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडत होतं, असे ते म्हणाले.

Leave a Comment

You cannot copy content of this page