वाडेबोल्हाईतील पठारे वस्तीत बिबट्याचा प्राणघातक हल्ल्यात ११ शेळ्यांची पिल्ले मृत्युमुखी

Photo of author

By Sandhya


वाडेबोल्हाईतील वाडेगाव जवळ असलेल्या पठारे वस्तीमध्ये वाडेगाव-केसनंद रोडलगत असलेल्या मारुती उर्फ बापू ठवरे व भीमाबाई लाला ठवरे यांच्या घराशेजारी त्यांच्या मालकीच्या असलेल्या मेंढ्यांच्या,शेळ्यांच्या वाड्यात संरक्षण तार कंपाऊंडची जाळी वाकवून बिबट्याने चोर पावलांनी शिरून शेळी, बकऱ्यांवर प्राणघातक जीवघेणा हल्ला करून ११ शेळ्यांची पिल्ले, करडे मृत्युमुखी पडली असून तर तीन शेळीची पिल्ले/करडे जखमी झाली आहेत. ही घटना ११ डिसेंबर बुधवारी,रात्री ११ वाजता घडली. यामध्ये ठवरे कुटुंबाचे जवळपास दीड लाखापेक्षा जास्त नुकसान झाले असून वन विभाग व सबंधित शासनाच्या खात्याने या प्रकरणी योग्य तो पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी विनंती या ठिकाणी ग्रामस्थ आणि ठवरे कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. घटना घडल्या स्थळी त्वरित वाडेबोल्हाईचे युवा नेते वैभव राजेंद्र पठारे, अतुल उंद्रे, अक्षय गायकवाड, पार्थ गाडेकर या ग्रामस्थांनी घटनास्थळी लगेच भेट देऊन चौकशी करून सबंधित खात्यांचे अधिकाऱ्यांना या घटनेबाबत माहिती दिली. गेल्या आठ ते दहा दिवसापासून केसनंद, आव्हाळवाडी, मांजरी, वाघोली, डोमखेल, कोलवडी, साष्टे, बिवरी या परिसरामध्ये बिबट्या दिसल्याचे अनेक नागरिकांना निदर्शनास आले आहे. तशी माहितीही त्यांनी वनखात्याला कळवली होती, त्यानंतर मांजरी परिसरामध्ये दोन शेळीच्या पिल्लांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार मारले होते. आठ दिवसांपूर्वी ठवरे यांच्या शेजारील दादा केसकर यांच्या गरोदर मेंढीवर हल्ला करून तिला बिबट्याने ठार केले होते. त्यामुळे मांजरी,वाडेगाव,न्हावी सांडस,शिरसवडी या परिसरामध्ये अनेक बिबटे असल्याचे सिद्ध झाले आहे. बिबट्यांचे प्रमाण वाढले असून अनेक बिबटे परिसरामध्ये वावरत आहे बिबट्याने काल भयानक मोठा शेळ्यांच्या ११ पिल्ले मृत्युमुखी पाडून उच्छाद मांडला आहे.तरी यापुढील काळात मनुष्यहानी सारखे अनर्थ टाळण्यासाठी वन खात्याने योग्य ती खबरदारी घेऊन परिसरामध्ये पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करावे. तसेच पुढील काळात यापेक्षा जास्त मोठे नुकसान होऊ नये याकरिता वन खात्याने योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन घटनेची पाहणी करीत वाडेबोल्हाईचे माजी सरपंच कुशाभाऊ गावडे, माजी उपसरपंच संजय भोरडे, सरपंच वैशाली चंद्रकांत केसवड, माजी उपसरपंच संदिप गावडे, वायरमन अमोल पायगुडे, सोपानकाका गावडे, ग्रामपंचायत सदस्य नंदू भोर, चेअरमन निळकंठ केसवड, लालासाहेब गावडे, ज्ञानेश्वर गावडे, माजी उपसरपंच बाळासाहेब केसवड, आप्पा गावडे, जगन्नाथ ढवळे, विठठल गावडे, संजय पायगुडे, आदी ग्रामस्थांनी वन खात्याला केले आहे.

घटनास्थळी वनखाते,पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून बिबट्याने हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर वनखात्याचे वनरक्षक रासकर, वनसेवक बाजारे, पशू वैद्यकीय अधिकारी गाडे, मोमीन, पवार यांनी घटनास्थळी पाहणी करीत पंचनामा करून त्यांनी परिसरामध्ये त्वरित पिंजरा लावण्यात येईल. व सबंधित नुकसान झालेल्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page