इटलीच्या सीसीली समुद्रात 36 अब्ज रुपयांचे कोकेन पाण्यावर तरंगते

Photo of author

By Sandhya

इटलीच्या सीसीली समुद्रात 36 अब्ज रुपयांचे कोकेन पाण्यावर तरंगते

इटलीच्या पूर्व सीसीली समुद्रात मोठ्या प्रमाणात कोकेन पाण्यावर तरंगताना आढळून आले आहे. या दोन टन कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 440 मिलियन युरो अर्थात 36 अब्ज रूपये एवढी प्रचंड आहे.

इटलीच्या पोलिसांनी सोमवारी हा ऐवज जप्त केला. स्थानिक वृत्तपत्र गार्डिया डि फिनान्झाने दिलेल्या बातमीनुसार 70 वॉटरप्रूफ पिशव्यांमध्ये हे कोकेन भरण्यात आले होते.

मासेमार लोक जे जाळे वापरतात त्या जाळ्यात ही सगळी सामग्री एकत्रित ठेवण्यात आली होती व त्यातच सिग्नल देणारे एक उपकरणही बसवण्यात आले होते. 2021 मध्येही इटलीच्या पोलिसांनी समुद्रात 20 टन कोकेन जप्त केले होते.

Leave a Comment