मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे वादळ मुंबईत २० जानेवारीला धडकणार आहे. ते तेथे आमरण उपोषण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाचा मार्ग उद्या जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आज बुधवारी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून माध्यमांशी संवाद साधला.
आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही. पण आम्हाला आमच्या मुलांच्या भविष्यासाठी मुंबईला जावेच लागेल. गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. संबंधित बातम्या
मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली जरांगे यांना मुंबईला येण्याची वेळच येणार नाही : गिरीश महाजन ओबीसींचे २० जानेवारीपासून प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन
मराठा समाजाची नाराजी ओढवून घेऊ नका. मराठ्यांवर खोटे गुन्हे दाखल करु नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मराठा समाजासाठी पूर्ण ताकद, जीव पणाला लावणार आहे. आपल्या पश्च्यात मुलांचे हाल होतील. त्यासाठी आता घर सोडा आणि मुंबईकडे चला, अशी हाक त्यांनी मराठा समाजाला दिली आहे.
मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आम्ही धनगर समाजासोबत आहोत. प्रकाश शेंडगेंनी धनगरांना लाभ देण्यासाठी शक्ती वापरावी, असेही त्यांनी सांगितले. तर मनोज जरांगे यांना मुंंबईला येण्याची वेळच येणार नाही.
२० तारखेपूर्वी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी, राज्यातील ओबीसी समाजाकडून मुंबईसह प्रत्येक जिल्ह्यात २० जानेवारीपासून आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कोणताही विरोध नाही. पण राज्य सरकारने ओबीसीमधून आरक्षण देऊ नये व जातनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी राज्यातील ओबीसी समाजाकडून मुंबईसह प्रत्येक जिल्ह्यात 20 जानेवारीपासून आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.